कुडाळ पंचायत समितीच्या शिरपेचात रोवला तुरा
स्वप्नील कदम l कुडाळ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गंजपेठ-पुणे येथील राजश्री शाहू प्रतिष्ठान पुणे तर्फे राजश्री शाहू आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने बावं गावच्या ग्रामसेविका रेश्मा मारुती ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गंजपेढ पुणे येथील राजश्री शाहू प्रतिष्ठान पुणे तर्फे आपल्या कार्यकाळात केलेली विविध विकास कामे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तासेच गावाच्या विकासासह तालुका, राज्य व देशाच्या विकासात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन केलेल्या कार्याचा गौरव म्हणून राजश्री शाहू आदर्श ग्रामसेवक पुरस्कार राजश्री शाहू प्रतिष्ठान,दक्ष मराठी पत्रकार संघ व जागृत शोध वृत्तपत्र यांच्या संयोगाने संस्थापक अध्यक्ष श्रीमंदिलकर यांच्या पुढाकाराने सन्मानित करण्यात आले. कुडाळ पंचायत समितीच्या एक हुशार आणि अभ्यासू ग्रामसेवक म्हणून ओळख असणाऱ्या ग्रामसेविका रेश्मा ठाकूर यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत पुणे येथील राजश्री शाहू प्रतिष्ठान यांच्यावतीने त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबाबत बांव ग्रामस्थ तसेच कुडाळ पंचायत समितीच्या वतीने अभिनंदन केले जात आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या हस्ते नुकतेच सौ.ठाकूर यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
Rajarshi Shahu pratishthan. All Rights Reserved AIS.